७७ कोरोनामुक्त तर ४४ नव्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:23+5:302020-12-28T04:15:23+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी ७७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांची ...

77 coronal free and 44 new ones added | ७७ कोरोनामुक्त तर ४४ नव्याची भर

७७ कोरोनामुक्त तर ४४ नव्याची भर

चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी ७७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार १७९ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार २६९ झाली आहे. सध्या ५५१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६९ हजार ९४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४४ हजार ८३१ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३५९ बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

रविवारी बाधित आलेल्या ४४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १७, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर एक, भद्रावती चार, नागभीड तीन, सिंदेवाही एक, राजुरा एक, चिमूर सहा, वरोरा चार, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 77 coronal free and 44 new ones added