वेकोलि माजरी खाणीतील ७५ कामगारांच्या बदल्या

By Admin | Updated: July 29, 2015 00:51 IST2015-07-29T00:51:02+5:302015-07-29T00:51:02+5:30

वेकोलिच्या माजरी खाणीत कार्यरत ७५ कामगारांच्या बदल्या करण्याचा निर्णय वेकोलिच्या माजरी व्यवस्थापनाने घेतला.

75 employees of Vaikoli Majri mine | वेकोलि माजरी खाणीतील ७५ कामगारांच्या बदल्या

वेकोलि माजरी खाणीतील ७५ कामगारांच्या बदल्या

संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात : बदल्या रद्द करण्याची मागणी
माजरी : वेकोलिच्या माजरी खाणीत कार्यरत ७५ कामगारांच्या बदल्या करण्याचा निर्णय वेकोलिच्या माजरी व्यवस्थापनाने घेतला. या निर्णयावर कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या बदल्या तत्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
माजरी येथील भूमिगत खदानीचे खुल्या खाणीत रुपांतर करण्यात आले. त्यानंतर येथील ८५० कामगारांवर बदलीचे सावट गडद झाले होते. यादरम्यान शुक्रवारी वेकोलि माजरी व्यवस्थापनाने ७५ कामगारांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर करून या भीतीला दुजोरा दिला. या निर्णयामुळे काही दिवसात आपल्यावरही बदलीची पाळी येण्याची भीती कामगारांमध्ये असून कुटुंबीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अचानक केलेल्या बदल्यांची कामगार संघटनांनी गंभीर दखल घेत हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. असे न केल्या कामगारांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू मजदूर संघ, आयटक, भारतीय मजदूर संघ व सिटू या संघटनांनी दिला आहे.
हा निर्णय घेताना कुणालाही विश्वासात घेण्यात आले नाही. या सर्व कामगारांना येथील इलेक्ट्रीकल, मॅटेनन्स, सुरक्षा तसेच ठेकेदारी विभागात समाविष्ट करण्याची सोय आहे. असे न करता इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांच्या बदल्या करणे अन्यायकारक असल्याचे जयनारायण पांडे, धर्मपाल जगन्नाथ, दीपक डोंगरवार यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: 75 employees of Vaikoli Majri mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.