७५ कोरोना पॉझिटिव्ह : एका बाधिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:42+5:302021-03-13T04:52:42+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ५३६ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ३५८ झाली ...

७५ कोरोना पॉझिटिव्ह : एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ५३६ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ३५८ झाली आहे. सध्या ७९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख २८ हजार ६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख एक हजार ७४२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६४, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण रोज आढळत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
चंद्रपुरात २७, वरोरात २९ रुग्णांची नोंद
आज बाधित आढळलेल्या ७५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २७ व चंद्रपूर तालुका सहा, भद्रावती सहा, ब्रह्मपुरी एक, मूल दोन, वरोरा २९, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर व वरोरा शहरात रुग्णसंख्या अधिक असल्याने प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.