७२ हजार कुटुंबे शौचालयाविना
By Admin | Updated: February 12, 2015 00:47 IST2015-02-12T00:47:38+5:302015-02-12T00:47:38+5:30
जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हा हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, २०१३ च्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तब्बल ७२ हजार ८२१ कुटुंबाकडे...

७२ हजार कुटुंबे शौचालयाविना
चंद्रपूर : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हा हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, २०१३ च्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तब्बल ७२ हजार ८२१ कुटुंबाकडे शौचालय नसल्याची माहिती आहे.
राज्य शासनाच्या निर्मल ग्राम अभियानामार्फत गावागावात शौचालय बांधण्यासाठी नागरिकांत जनजागृती केली जात आहे. यात अनेक गावांनी सहभाग घेतला. १०० टक्के शौचालय असलेल्या गावांना निर्मल ग्राम म्हणून राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात आले. मात्र, तरीही अनेक गावांतील परिस्थीती सुधारलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गावागावात जाऊन नागरिकांत जनजागृती केली जात आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी पाऊले उचलली असून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर याची व्यापक जनजागृती केली जात आहे. दारिद्र रेषेखालील एकूण १ लाख ४३ हजार ५०९ कुटुंब असून यातील १ लाख १३ हजार ९२२ कुटुंबाकडे शौचालय असून २९ हजार ५८७ कुटुंबाकडे शौचालय नाही. ही टक्केवारी २०.६ एवढी आहे. तर दारिद्र रेषेवरील १ लाख ४८ हजार ४२९ कुटुंब असून यापैकी १ लाख ५ हजार १९५ कुटुंबाकडे शौचालय आहे. तर ४३ हजार २३४ कुटुंबाकडे शौचालय नाही. ही टक्केवारी २९.१ एवढी आहे.