भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:32+5:30
भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. केजीबीव्ही वसतिगृहामधे १८ बेडची व्ववस्था करण्यात आली होती. त्या केंद्राचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे.

भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. केजीबीव्ही वसतिगृहामधे १८ बेडची व्ववस्था करण्यात आली होती. त्या केंद्राचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे. आतापर्यंत ७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोघांमध्ये १४ दिवसात कसल्याही प्रकारची लक्षणे दिसली नाही. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आणखी ५ जण या कक्षात आहेत. भामरागड येथील भगवंतराव प्राथमिक तथा जय पेरसापेन माध्यमिक आश्रम शाळा निवासगृहात ९ जण, शिव मंदिर निवास गृहात १७ जण आहेत. परराज्य व जिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा भामनपल्ली येथे ८ जण, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ताडगाव येथे ४२ जण, मन्नेराजारामच्या राजे धर्मराव माध्यमिक आश्रम शाळा विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आले आहे. सध्या ७२ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आदिवासी आश्रम शाळेत कोविड केअर सेंटर आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था तहसील कार्यालयाने केली आहे.