‘व्हॅट’ मधून जिल्ह्याला ७०० कोटींचा महसूल

By Admin | Updated: February 13, 2015 01:29 IST2015-02-13T01:29:50+5:302015-02-13T01:29:50+5:30

जिल्ह्याला दरवर्षी मुल्यवर्धीत कराच्या (व्हॅट) स्वरूपात ७०० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. मुल्यवर्धीत कर भरणारे जिल्ह्यात सात हजारच्या जवळपास ...

700 crore revenue from 'VAT' in the district | ‘व्हॅट’ मधून जिल्ह्याला ७०० कोटींचा महसूल

‘व्हॅट’ मधून जिल्ह्याला ७०० कोटींचा महसूल

लोकमत विशेष
चंद्रपूर : जिल्ह्याला दरवर्षी मुल्यवर्धीत कराच्या (व्हॅट) स्वरूपात ७०० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. मुल्यवर्धीत कर भरणारे जिल्ह्यात सात हजारच्या जवळपास व्यापारी असून १२ व्यापारी हे एक कोटी रूपयांपेक्षा जास्त व्हॅट भरत असल्याची माहिती विक्रीकर अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य शासनाकडून दरवर्षी मुल्यवर्धीत कर वसूली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्ट दिले जाते. या उद्दिष्टानुसार व्हॅटची वसूली होते. जिल्ह्यात अनेक व्यवसाय करणारे व्यापारी वर्ग असून वस्तूंची आयात करून विक्री केल्यास त्यांना व्हॅट भरावे लागते. विक्रीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार सन २०११-१२ मध्ये ६१८ कोटी २१ लाख रूपयांचा व्हॅट वसूल करण्यात आला.
तर २०१२-१३ मध्ये ६६९ कोटी ७७ लाख, २०१३-१४ मध्ये ६८५ कोटी ६३ लाख व २०१४-१५ या चालू वर्षात आतापर्यंत ७०२ कोटी १५ लाख रूपये व्हॅट वसूल झाले आहे. वस्तुच्या किंमतीवर आधारीत ४ ते १२ टक्यांपर्यंत व्हॅट आकारले जाते.
व्हॅट कर वसूलीचा मुख्य उद्देश सामान्य नागरिक यांच्या सोबतच सरकारला सहायता करणे हा आहे. या करातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होते. (स्थानिक प्रतिनिधी)
२३ व्यापारी भरतात दहा लाखांपेक्षा जास्त कर
जिल्ह्यात सात हजारांवर नोंदणीकृत व्यापारी असून २३ व्यापारी हे मुल्यवर्धीत कर म्हणून एक कोटींपेक्षा कमी मात्र १० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरतात. तर ९९५ व्यापारी हे दहा लाखांपेक्षा कमी कर भरतात.
पाच हजार व्यापारी भरत नाही कर
विक्रीकर विभागाकडे दरवर्षी व्यापाऱ्यांची नोंदणी होते. मात्र पाच हजारच्या जवळपास व्यापारी हे नोंदणी असूनही कर भरत नसल्याची माहिती आहे. २०११-१२ मध्ये ५१२२ तर २०१२-१३ मध्ये ५३७० व्यापाऱ्यांनी नोंदणी असूनही मुल्यवर्धीत कर भरलेला नाही.

 

Web Title: 700 crore revenue from 'VAT' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.