□मूल तालुक्यात पाचवी ते आठवीच्या ६८ शाळा झाल्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:15+5:302021-02-05T07:37:15+5:30
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह मूल : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या प्रभावाने गेल्या मार्च २०२० पासून शाळा बंद केल्या होत्या. यापूर्वी इयत्ता ...

□मूल तालुक्यात पाचवी ते आठवीच्या ६८ शाळा झाल्या सुरू
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
मूल : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या प्रभावाने गेल्या मार्च २०२० पासून शाळा बंद केल्या होत्या. यापूर्वी इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शासनाने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मूल तालुक्यात ६८ शाळा असून, सर्वच शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या आहेत.
पहिल्याच दिवशी विद्यार्थीवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. येथील गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषयतज्ज्ञ यांचे शाळा भेट नियोजन करून शाळेला भेट देण्यात आली. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी तपासण्यात आल्या. वर्ग ५ ते ८ पर्यंतचे वर्ग सुरळीत सुरू झाले.
इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्याने बच्चे कंपनीची काही दिवसात शाळा सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.