शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

जिल्ह्यातील ६७ रेतीघाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:44 PM

प्रशासकीय दिरंगाईमुळे नदी आणि नाल्याच्या घाटांची लिलाव प्रक्रिया खोळंबली होती. याचा गैरफायदा घेऊन रेतीमाफीयांनी बेसुमार खनन सुरू ठेवले होते.

ठळक मुद्देअवैध खननाला बसणार चाप : दिरंगाईने बुडाला होता कोट्यवधींचा महसूल

राजेश मडावी ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रशासकीय दिरंगाईमुळे नदी आणि नाल्याच्या घाटांची लिलाव प्रक्रिया खोळंबली होती. याचा गैरफायदा घेऊन रेतीमाफीयांनी बेसुमार खनन सुरू ठेवले होते. परिणामी, जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. मात्र, अप्पर जिल्हाधिकाºयांनी एकाच वेळी जिल्ह्यातील ६७ घाटांचा लिलाव सुरू केल्याने रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.नोटबंदी आणि जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रावर विपरित परिणाम झाल्याचे मानले जाते. मात्र, एक वर्षापासून जिल्ह्यातील नदी व नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरूच आहे. चोरुन आणलेली ही रेती अनेक ठिकाणी साठवून ठेवली जाते. अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी तलाठी, तहसीलदार ते उपविभागीय अधिकारी स्तरावर यंत्रणा तयार करण्यात आली़ घाटांवर छापा टाकायचा असेल, तर पोलिसांचीही मदत घेण्याचा आदेश सरकारने दिला आहे़ या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे धाडस न दाखविल्याने रेतीमाफ ीयांंनी एक समांतर यंत्रणा तयार करून काही भ्रष्ट अधिकाºयांना आपलेसे करून घेतले़त्यामुळे अवैध रेती व गौण खनिज उत्खननास प्रतिबंध घालण्यासाठी कागदावर अनेक नियम; पण, प्रत्यक्षात ‘रेतीमाफ ीयांंनाच अभय’ अशी स्थिती तालुकास्तरावर सुरू आहे़ तर दुसरीकडे कालावधी संपूनही रेती घाटांचे लिलाव प्रशासकीय पातळीवरुन रखडवून ठेवण्याचे काम काही अधिकाºयांनी केले़त्यामुळे रेतीमाफीयांंना स्वत:चे चांगभले करून घेण्याची आयतीच संधी मिळाली़ लिलावाची प्रक्रिया न झालेल्या नदी व नाल्याच्या घाटातून रेतीचे अवैध उत्खनन करून प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला़ दरम्यान, जिल्हाधिकाºयांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने दोन आठवड्यापासून संबंधित यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत आहे़रेतीमाफियांंनी लक्ष्य केलेले घाटब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, मूल, नागभीड, राजुरा आणि भद्रावती तालुक्यातील लिलाव प्रक्रिया रखडल्या होत्या़ त्यामुळे रेती चोरट्यांनी संबंधित घाटांना लक्ष्य केले होते़ प्रशासनाची नजर चुकवून अथवा काही भ्रष्ट अधिकाºयांच्या आशिर्वादामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात होता़ यामध्ये कोलारी, बोडधा, चिचगाव, हळदा, खरकाळा, बोढेगाव, वासेरा, हरणी, मांगली, मोखाळा, पळसगाव, कोर्टी तुकूम, खांबाडा, नलपडी, कुनाडा, कोची, राळेगाव, मनगाव, आष्टा, कोसंबी, नलेश्वरी चक दहेगाव, डोंगरगाव, उश्राळा, हळदी गावगन्ना, चक सोमनपल्ली, हिवरा, पुर्डी हेटी, येनबोथला, सावरगाव, चिखलगाव आदी घाटांचा समावेश आहे़अनामत रकमेचे त्रांगडेअनेक वर्षांपासून रेतीची सराईत लूट करून अनेक कंत्राटदार आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले़ काही अधिकाºयांना सहजपणे मॅनेज करता येते, या आविर्भावातून त्यांनी घाटांच्या लिलावासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यास सावध पवित्रा घेतला़ लिलावधारकास अनामत रक्कम प्रत्येकी तीन लाख किंवा आॅफ सेट प्राईजच्या २० टक्के यापेक्षा जी अधिक असेल, ती रक्कम भरावी लागते़ मात्र, ज्या रेतीघाटांची किंमत दहा लाखांपेक्षा कमी आहे़ त्या घाटांकरिता आॅफ सेट प्राईजच्या २० टक्के रक्कम भरता येते़ या व्यवसायात नव्यानेच येणाºया प्रामाणिक कंत्राटदारांना ही रक्कम भरणे आवाक्याबाहेरचे आहे़ त्यामुळे आॅनलाईन नोंदणीला फ ारसा प्रतिसाद मिळाला नाही़ ही प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली़