६६ कोरोनामुक्त तर ४३ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST2020-12-25T04:23:22+5:302020-12-25T04:23:22+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४३ कोरोनाबाधित रुग्णांची ...

66 coronal free and 43 newly positive | ६६ कोरोनामुक्त तर ४३ नव्याने पॉझिटिव्ह

६६ कोरोनामुक्त तर ४३ नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार २१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ४४ झाली आहे. सध्या ६२१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६६ हजार ९९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४२ हजार ८४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३५६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३२९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

गुरुवारी बाधित आलेल्या ४३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ११, चंद्रपूर तालुका सात, भद्रावती चार, ब्रम्हपुरी ११, नागभीड दोन, सिंदेवाही एक, मूल एक, चिमूर दोन, वरोरा तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 66 coronal free and 43 newly positive