दोन वीजचोरांकडून ६३ हजार ७४० रक्कम वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:32+5:302021-07-18T04:20:32+5:30

उपकार्यकारी अभियंता प्रवीण तुराणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीजचोरी पकडणाऱ्या भरारी पथकाला बामणी येथील वीज ग्राहक इलियास इसाक मोहम्मद यांनी ...

63,740 recovered from two power thieves | दोन वीजचोरांकडून ६३ हजार ७४० रक्कम वसूल

दोन वीजचोरांकडून ६३ हजार ७४० रक्कम वसूल

उपकार्यकारी अभियंता प्रवीण तुराणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीजचोरी पकडणाऱ्या भरारी पथकाला बामणी येथील वीज ग्राहक इलियास इसाक मोहम्मद यांनी २ हजार ३१६ युनिट वीजचोरी केल्याचे आढळले. त्याच्याकडून ४७ हजार ५२० वसूल करण्यात आले, तर बल्लारपूरचे पुंडलिक सातपुते यांनी १,०९२ युनिट केलेली वीजचोरी पकडली. त्यांनीही १६ हजार २२० ही रक्कम वीज कार्यालयात जमा केली. मात्र, शेख सत्तार शेख गफ्फार बामणी यांनी ३ हजार १४६ युनिट वीजचोरी केल्याचे भरारी पथकास आढळले. त्याच्यावर ६० हजार ३६० रुपये थकबाकी बाकी आहे. महावितरण कंपनीचे भरारी पथक बल्लारपूर तालुक्यात गस्तीवर असून, कुठेही वीज चोरी होत असल्याचे आढळल्यास वीज कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 63,740 recovered from two power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.