घुग्घुस येथे ६० टन कोळसाची अफरातफर

By Admin | Updated: February 27, 2015 00:51 IST2015-02-27T00:51:14+5:302015-02-27T00:51:14+5:30

वेकोलिच्या कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या दोन वेगवेगळ्या कारखान्यात कोळसा वाहतुक करणाऱ्या चार ट्रक चालकाने कोळसा कारखान्यात न पोहचविता ...

60 tonnes of coal fodder in Goghugas | घुग्घुस येथे ६० टन कोळसाची अफरातफर

घुग्घुस येथे ६० टन कोळसाची अफरातफर

घुग्घुस : वेकोलिच्या कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या दोन वेगवेगळ्या कारखान्यात कोळसा वाहतुक करणाऱ्या चार ट्रक चालकाने कोळसा कारखान्यात न पोहचविता कोळसा खोट्या पावत्या बनवून ४० टन कोळशाची अफरातफर केल्याचा तक्रारीवरुन चार ट्रक चालकाला घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल चौधरी (रा. वांढरी),, शंकर शेंडे (यशवंत नगर पडोली), अंकुश सिडाम, राजेश यादव (घुग्घुस) तर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर जयवंत पाइकवार, विद्या टॉकीज घुग्घुस व इरफान शमीम शेख इंदिरानगर घुग्घुस असे अटक केलेल्या चालकाची नावे आहेत. या प्रकरणाचे पोलिसांनी खोलवर तपास केल्यास मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींना २ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला आहे.
वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या विदर्भ इंडस्ट्रीज पावर कंपनीला कोळसा ट्रक क्र.एम.एच ३४ एम. ९१३६, एमएच ३४ ई- १२ भरुन चालक निघाले. मात्र कोळसा बुटीबोरी कंपनीत कोळसा खाली न करता खोट्या रसिदा बनवून अन्य ठिकाणी खाली केला. त्यामुळे अफरातफर केल्याचा प्रकार ९ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान उघडकीस आला. सपा ट्रान्सपोर्टच्या सुपरवायझर रुपेश जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दोन्ही ट्रक चालकाला घुग्घुस पोलिसांनी अटक केली.
मंगळवारी रात्री निलजाई कोळसा खाणीतून इंडस्ट्रीज बुटीबोरीला कोळसा भरुन निघालेल्या दोन ट्रक चालकांनी संगणमताने ४० टन कोळशाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार कोळसा वाहतुक करणाऱ्या ट्रान्सपोर्टर सतीश देवतळे यांच्या लक्षात येताच, घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या दोन्ही ट्रक चालकाला व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जयवंत पाइकवार व इरफान शमीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी ठाणेदार मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे, पोलीस उपनिरीक्षक मुंडे तपास करीत आहे. या प्रकरणात बुटीबोरी कंपनीचे काही अधिकारी अडकण्याची शक्यता असून कोळसा अफरातफरीत सहभागी मोठे मासे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: 60 tonnes of coal fodder in Goghugas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.