६ हजार ३७६ नागरिकांनी घेतला पोर्टबिलिटीद्वारे धान्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:04+5:302021-01-08T05:34:04+5:30
चंद्रपूर : कार्डधारकांना देशातही कुठूनही रेशन धान्य घेता यावे, यासाठी पुरवठा विभागाने पोर्टबिलीटी व्यवस्था निर्माण केली. रेशन दुकानदार धान्य ...

६ हजार ३७६ नागरिकांनी घेतला पोर्टबिलिटीद्वारे धान्याचा लाभ
चंद्रपूर : कार्डधारकांना देशातही कुठूनही रेशन धान्य घेता यावे, यासाठी पुरवठा विभागाने पोर्टबिलीटी व्यवस्था निर्माण केली. रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर या व्यवस्थेतून स्वस्त् धान्याची उचल करता येते. प्रशासनाने या व्यवस्थेची योग्य अंमलबजावणी केल्याने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३७६ नागरिकांनी घेतला पोर्टबिलिटीद्वारे धान्याचा लाभ घेतला आहे.
कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर असंघटित मजूर, सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला. राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या. त्यामुळे अन्नाची गरज कशी भागवावी, हा प्रश्न निर्माण झाला. अनेकांकडे सरकारी स्वस्त धान्य दुकानाचे कार्ड असूनही धान्य मिळविण्याचे मार्ग बंद झाले. काही दुकानदार तकलादू कारणे पुढे करून धान्य देण्यास टाळाटाळ करतात. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत अन्न व पुरवठा विभागाने सुरू केलेल्या पोर्टबिलिटी व्यवस्थेची माहिती मिळताच अनेकांनी राज्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल केली. त्यामुळे सध्याची पोर्टबिलिटी व्यवस्था पुन्हा अधिक सक्षम करून ती प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.
अशा आहेत तक्रारी
सरकारी स्वस्त धान्य दुकानदार खुल्या बाजारात धान्य विकण्यासाठी विविध फंडे वापरतात. पोर्टबिलिटी यंत्रणेचा वापर करण्यास टाळाटाळ करतात. ही यंत्रणा अत्यंत पारदर्शी आहे. त्यामुळे दुकानदारांना कुठलीही हेराफेरी करतात येत नाही. लाभार्थी धान्यासाठी परवानाधारक दुकानात गेल्यास धान्य संपल्याचे कारण पुढे करतात, अशी माहिती नागरिकांनी दिली.
अशी करा ऑनलाईन तक्रार
सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित तक्रारी नागरिकांना जिल्हा पुरवठा कार्यालय व राज्य पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरही करता येते. सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ५ .३० या कार्यालयीन वेळेत सुरू असते. याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्राच्या ई-मेलवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे. मात्र, जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाईचा तपशीला मिळू शकला नाही.
आता ''''''''वन नेशन, वन कार्ड
देशभरात रेशन कार्डबाबतची ''''''''वन नेशन, वन कार्ड'''''''' ही योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे, रेशन कार्ड कोणत्याही राज्यात बनलेले असले तरी, कार्डधारकाला रेशन धान्य खरेदी करण्यासाठी या कार्डचा उपयोग दुसऱ्या राज्यातही करता येणार आहे. कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक, कोणत्याही अन्य राज्यातील रेशनच्या दुकानातून कमी किंमतीत स्वस्त धान्य खरेदी करु शकतात, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली.