जिल्ह्यात नवे ६ कोरोना रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:42+5:30

जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा सोमवारी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील १२९ बाधित अधिक ४ बाहेरील बाधित अशी एकून कोरोना रूग्णांची संख्या १३४ झाली आहे.

6 new corona patients were found in the district | जिल्ह्यात नवे ६ कोरोना रूग्ण आढळले

जिल्ह्यात नवे ६ कोरोना रूग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात बुधवारी आणखी ५ कोरोना बाधित आढळले. पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांसह १२८ झालेली सोमवारी रात्रीची संख्या बुधवारी १३३ वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा सोमवारी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील १२९ बाधित अधिक ४ बाहेरील बाधित अशी एकून कोरोना रूग्णांची संख्या १३४ झाली आहे. ऊर्जानगर येथे आढळलेल्या एका बाधिताच्या संपर्कातील तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची ६० वर्षीय आई व सात वर्षीय नातवासोबतच घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तिचा समावेश आहे. बुधवारी पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर हा व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे. आतापर्यंत ७९ बाधित कोरोना आजारातून बरे झाले. ५४ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे.

हॉटेल, लॉज, खासगी विश्रामगृह सुरू होणार
चंद्र्रपूर : जिल्ह्यात निवासाची सुविधा असलेले सर्व हॉटेल, लॉज, खासगी विश्राम गृह (प्रतिबंधीत क्षेत्रातील आस्थापना वगळता) ३३ टक्के या मर्यादित क्षमतेने नियम व अटींच्या आधीन राहून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कोविड १९ प्रतिबंधात्मक उपायाबाबत मार्गदर्शक तत्त्वे पोस्टर्स, स्टॅण्डिज, दृकश्राव्य इत्यादी साधनांद्वारे स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक आहे. हॉटेल व पार्किंगमध्ये वाहनतळांचे योग्य व्यवस्थापन करावे.रांगेसाठी विशिष्ट खुणा कराव्यात, सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी बसण्याची व्यवस्था करावी, बाहेरील व्यक्तीकडून प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. रिसेप्शन टेबल, त्याजवळील जागेत संरक्षक काच लावावा. वातानुकूलीत उपकरणांचे तापमान सेटिंग २४-३० डिग्री सेल्सिअस श्रेणीत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: 6 new corona patients were found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.