भद्रावती पोलीस ठाण्याची इमारत, सदनिकेसाठी ६ कोटी ६७ लाखांचा निधी

By Admin | Updated: April 11, 2016 01:21 IST2016-04-11T01:21:19+5:302016-04-11T01:21:19+5:30

भारतीय जनता पार्टीचे कोंढा-घोडपेठ जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा बांधकाम व नियोजन समितीचे सदस्य विजय वानखेडे यांनी सातत्याने केलेल्या

6 crore 67 lakhs fund for Bhadravati police station building | भद्रावती पोलीस ठाण्याची इमारत, सदनिकेसाठी ६ कोटी ६७ लाखांचा निधी

भद्रावती पोलीस ठाण्याची इमारत, सदनिकेसाठी ६ कोटी ६७ लाखांचा निधी

केंद्र शासनाचा निधी : पोलीस कर्मचाऱ्यांत आनंद
भद्रावती : भारतीय जनता पार्टीचे कोंढा-घोडपेठ जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा बांधकाम व नियोजन समितीचे सदस्य विजय वानखेडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून आधुनिकीकरण अंतर्गत निधीतून भद्रावती पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी असलेल्या निवासस्थान बांधकामाकरीता ६ कोटी ६७ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी भद्रावती शहरातील नवीन प्रशासकीय इमारत व कर्मचाऱ्यांच्या सदनिका बांधकामाबाबत असलेली अनास्था तब्बल सात वर्षांचा कालखंड लोटूनही व सदर जागेचा ताबा जिल्हा पोलीस अधिक्षकांननी घेऊनही निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याची गंभीरपणे दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडे पत्राद्वारे सदर बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा करत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही या प्रश्नात लक्ष घालण्याकरिता निवेदनाद्वारे विनंती केली होती. भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेऊन संबंधितांकडे पत्रव्यवहार केला होता.
अखेर या इमारत व निवासस्थान बांधकामाकरिता ६ कोटी ६७ लाख ४६ हजार रुपयांचा निधी निर्गमित करण्यात आल्याचे पत्र वानखेडे यांना पाठवून सदर बांधकामास १६ मार्च रोजी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली आहे. भद्रावती येथे या निधीतून पोलीस ठाण्याची इमारत व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ५२ निवासस्थान बांधण्यात येणार असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली. सदर बांधकामास सुरूवात झाल्याने भद्रावती शहरात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची सोय होत असल्याने पोलीस विभागामध्ये आनंद व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 6 crore 67 lakhs fund for Bhadravati police station building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.