५८० गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:15+5:302021-04-17T04:28:15+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या कोरोनाने चांगलाच कहर केला आहे. चंदपूरसह प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. असे असले ...

५८० गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले
चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या कोरोनाने चांगलाच कहर केला आहे. चंदपूरसह प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ५८० गावांनी अजूनही कोरोना विषाणूला गावाच्या वेशीबाहेर रोखले आहे. ग्रामस्थ, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात देशात लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक विविध गावात अडकून पडले होते. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होत गेल्याने जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र आता पु्न्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कोरोना रुग्णसंख्या तसेच मृत्यूदरही जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ५८० गावांमध्ये अजूनही कोरोनाने धडक दिली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये समाधान असले तरी भिती मात्र कायम आहे.
बाॅक्स
३ मे २०२०
जिल्ह्यात कोरनाचा पहिला रुग्ण
जिल्ह्यात एकूण गावे १८३६
गावांत कोरोनाचा रुग्ण नाही ५८०
-एकूण रुग्ण ३९०५४
एकूण मृत्यू ५५२
बाॅक्स