५६ कोरोनामुक्त तर ४८ नव्या बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:17+5:302021-01-09T04:23:17+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४८ कोरोनाबाधित रुग्णांची ...

56 coronal free and 48 new constraints added | ५६ कोरोनामुक्त तर ४८ नव्या बाधितांची भर

५६ कोरोनामुक्त तर ४८ नव्या बाधितांची भर

चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ४८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ६०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ८९७ झाली आहे. सध्या ३३० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८३ हजार ७५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ५८ हजार ७७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये गौराळा वार्ड भद्रावती येथील ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शुक्रवारी बाधित आलेल्या ४८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २५, बल्लारपूर दोन, भद्रावती पाच, मूल एक, पोंभुर्णा एक, राजूरा एक, चिमूर दोन, वरोरा चार, कोरपना दोन, जिवती तीन व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 56 coronal free and 48 new constraints added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.