दुर्गापूर पीएचसी अंतर्गत एचआयव्ही बाधित ५५ रुग्ण
By Admin | Updated: February 1, 2015 22:53 IST2015-02-01T22:53:13+5:302015-02-01T22:53:13+5:30
दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या विविध भागात ५० ते ५५ एचआयव्ही बाधीत रुग्ण आहेत. यापैकी पाच रुग्ण येथे तर उर्वरीत ५० रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या

दुर्गापूर पीएचसी अंतर्गत एचआयव्ही बाधित ५५ रुग्ण
दुर्गापूर : दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या विविध भागात ५० ते ५५ एचआयव्ही बाधीत रुग्ण आहेत. यापैकी पाच रुग्ण येथे तर उर्वरीत ५० रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चाचणीत आढळून आले. ही बाब गंभीर असून काही रुग्ण नियमित औषधोपचार घेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एचआयव्ही या गंभीर आजाराला रोखण्याकरिता जनजागृती करुन माहिती देण्यात येते. मात्र, सतर्कता व जागरुकतेला बगल देणारे लोक आजाराला आजही बळी पडत आहेत. दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ऊर्जानगर-दुर्गापूरसह १५ ते १६ गावखेडे आहेत. या आरोग्य केंद्रात पाच एचआयव्ही बाधीत रुग्णांची नोंद असून याच परिसरातील ५० रुग्णांची जिल्हा सामानय रुग्णालयात नोंद आहे. यातील बहुसंख्य रुग्ण केवळ दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरातील आहेत. (वार्ताहर)