प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५५ कोटींचे वाटप
By Admin | Updated: October 21, 2015 00:59 IST2015-10-21T00:58:31+5:302015-10-21T00:59:16+5:30
हंसराज अहीर : शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणार

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५५ कोटींचे वाटप
राजुरा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी उभारलेला लढा आज पूर्णत्वास आला असून सदैव शेतकऱ्याच्या हितासाठी लढा देत राहणार, असे प्रतिपादन पवनी खदानीमधील अधिगृहित जमिनीचा मोबदला शेतकऱ्याना वाटप कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय उर्वरक मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
साखरी गावातील शेतकऱ्यांना ५५ कोटी रूपयांचे धनादेश वितरित करण्यात आहे. त्यामुळे आज साखरीमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. शेतकऱ्यांनी रॅली काढून मंत्रिमहोदयांचे भव्य स्वागत केले. ५५ कोटी रुपये आणि २३६ नोकऱ्या या खाणीच्या माध्यमातून मिळणार आहेत.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, वेकोलिचे सहप्रबंधक निदेशक आर.आर. मिश्र, राहुल सराफ, राजू घरोटे, साखरी सरपंच बेबीनंदा कोडापे, पवनीच्या सरपंच सरला फुलझेले, वरोडा सरपंच साईनाथ देठे, वेकोलिचे एस.एस. अली, के.एस. , रमेश बल्लेवार, नरेंद्र चंद, ए.के. जोशी, अरुण मस्की उपस्थित होते. प्रास्ताविक एस.के. वैद्यकियार यांनी केले. संचालन एम.के. सिंग यांनी तर आभार एस.के. जैन यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)