५४ लाख ७२ हजारांचे तलाव संवर्धनाचे काम अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:14+5:302021-07-08T04:19:14+5:30
शासकीय अंकेक्षकांनी ५४ लाख ७२ हजार रुपये खर्च केलेली रक्कम तात्पुरती अमान्य केली आहे. ४ लाख ४६ ...

५४ लाख ७२ हजारांचे तलाव संवर्धनाचे काम अमान्य
शासकीय अंकेक्षकांनी ५४ लाख ७२ हजार रुपये खर्च केलेली रक्कम तात्पुरती अमान्य केली आहे. ४ लाख ४६ हजार रुपये नगर परिषदेकडून करण्याचे अहवालात नमूद आहे. लेखा परीक्षक अहवालात अनेक त्रुटी काढून नगर परिषद मुख्याधिकारी यांना समज दिली आहे. यात कमी मुद्रांकावर करारनामा केला आहे. कामगारांचे ईपीएफ जमा केले नाही. कामाचा विमा काढला नाही. राॅयल्टी वसूल केली नाही. अतिरिक्त कामासाठी शासनाची परवानगी घेतली नाही. साहित्य चाचणी अहवाल नाही. यामुळे ठेकेदाराला जाब विचारला जावा. राजुरा-विहीरगाव अंतर जास्त दाखविले, त्याकरिता २६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात यावे, याकडेही सूरज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
तलावाच्या पाण्याची गुणवत्ता तपासली नाही. प्रकल्प सनियंत्रण समिती स्थापन केली नाही. नगर परिषदेचा १० टक्के हिस्सा वापरला नाही. शेवटी लेखा परीक्षकांनी तलाव संवर्धन योजनेचा उद्देश सफल झाला नाही, असे ताशेरे ओढले आहे. यासाठी जबाबदार नगर परिषद प्रशासनावर कार्यवाहीची मागणीही ठाकरे यांनी केली. पत्रकार परिषदेला आशिष यामनूरवर, पवन चिंतल, निखिल बजाईत, अजवन ठक, राहुल चव्हाण उपस्थित होते. याबाबत राजुरा नगरपालिकेच्या मुख्यधिकारी अर्शिया जुही यांना विचारले असता सविस्तर माहिती उपलब्ध करून देणार, असे सांगितले.