जिल्ह्यात ५४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:57+5:302021-01-08T05:33:57+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात ७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर, ५४ बाधितांची नव्याने भर ...

जिल्ह्यात ५४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात ७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर, ५४ बाधितांची नव्याने भर पडली. उपचारादरम्यान दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ५२० झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ८१० झाली. सध्या ३३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ३८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ५६ हजार ५३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम येथील ४८ वर्षीय पुरुष व गोकुलगल्ली बाजार वाॅर्ड येथील ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४२, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ५४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २५, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपूर एक, भद्रावती पाच, ब्रह्मपुरी एक, राजुरा चार, चिमूर सहा, वरोरा सात, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना आजार गेला नाही, रुग्ण आढळतच असल्याने आरोग्याची खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या.