५०७ पाणी नमुने दूषित
By Admin | Updated: October 28, 2015 01:17 IST2015-10-28T01:17:33+5:302015-10-28T01:17:33+5:30
दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, ....

५०७ पाणी नमुने दूषित
चंद्रपूर : दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वीत झालेल्या आहेत. मात्र, भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्हाभरातील पाणी स्त्रोतांची तपासणी केली असता, तब्बल ५०७ पाणी नमूने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर प्रश्ननिर्माण झाले असून दूषित पाण्यावरच नागरिकांना आपली तहाण भागवावी लागत आहे.
गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची असते. अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक हातपंप व विहीरींच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागत आहे. या पाणी स्त्रोतांची देखभाल व दुरुस्ती संबधीत ग्रामपंचायत, नगर पालिका व मनपा प्रशासनाची आहे. पाणी वाटपात उद्भवत असलेल्या समस्या दूर करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे.
मात्र, पाणी पुरवठ्यात येत असलेल्या विविध अडचणींमुळे अनेक गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हगवण, गॅस्ट्रो, साथीचे आजार बळावले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग पाणी पुरवठा योजनांवर संनियंत्रणाचे काम करते. दर महिन्याला पाणी नमूने घेऊन दूषित पाणी आढळल्यास त्यांना उपाययोजना करण्याचे सूचीत केले जाते. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा व शुद्धीकरणासंबधी उपाययोजना करतात. मात्र भूजल सर्व्हेक्षण विभागाने तपासणी केलेल्या १ हजार ३५६ नमुन्यांपैकी ५०७ नमुने दूषित आढळले आहेत. यात क्लोराईडयुक्त अयोग्य असलेले नमुने ११, फ्लोराईडयुक्त आढळले.