ग्रामसेवकावर पाच हजार रुपयाचा दंड व शिस्तभंगाची कार्यवाही
By Admin | Updated: April 21, 2016 01:17 IST2016-04-21T01:17:44+5:302016-04-21T01:17:44+5:30
माहितीचा अधिकार या अधिनियमाखाली कोलारी येथील माहितीकार देवराव हुमाजी गावंडे यांनी

ग्रामसेवकावर पाच हजार रुपयाचा दंड व शिस्तभंगाची कार्यवाही
आंबोली : माहितीचा अधिकार या अधिनियमाखाली कोलारी येथील माहितीकार देवराव हुमाजी गावंडे यांनी जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्राम पंचायत कोलारी यांच्याकडे माहिती मिळावी म्हणून अर्ज सादर केला होता.
ग्रामसेवक मशारकर यांनी अर्जदाराला तीस दिवसाच्या आंत माहिती पुरविणे अनिवार्य होते. मात्र माहिती न पुरविल्यामुळे जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक मशारकर यांच्याविरूद्ध गावंडे यांनी अपिलीय अधिकारी संवर्ग विकास अधिकारी पं.स. चिमूर यांच्याकडे अर्ज केला. त्यांनीही अर्जदाराला ४५ दिवसाच्या आंत अपिलकर्त्याला माहिती पुरविणे अनिवार्य होते.
परंतु द्वितीय अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी यांनी कसल्याही प्रकारची माहिती न पुरविल्यामुळे देवराव गावंडे यांनी जनमाहिती अधिकारी सचिव व प्रथम अपिलीय अधिकारी बीडीओ (चिमूर) यांच्या विरोधात राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांच्यासमोर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम १८ (१) अन्वये तक्रार दाखल केली होती. राज्य माहिती आयुक्तांनी संबधीतावर माहिती न पुरविल्या प्ररकणी पाच हजार रूपयाचा दंड व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. (वार्ताहर)