स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद

By Admin | Updated: June 11, 2014 23:51 IST2014-06-11T23:51:22+5:302014-06-11T23:51:22+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावर्षी खरेदी योजनांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र

50 lakhs for Competitive Examination Center | स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद

स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावर्षी खरेदी योजनांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र भटकू नये यासाठी ५० लाख रुपयांचे ज्युबिली हायस्कूल परिसरात पूर्वतयारी केंद्र उभारण्यावर तरतूद करण्यात आली आहे.
यावर्षी ५६ कोटी ३६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात जास्तीत जास्त खरेदीवर भर देण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीमध्ये यावर्षी कपात करण्यात आली आहे. महिला बाल कल्याणच्या योजनांसाठी १ कोटी ९ लाखांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली. विशेष करून मागणी नसलेले सौर कंदिल, कौर कुंपन, प्रशिक्षण आदींवर जास्त निधी ठेवण्यात आल्याचा सदस्यांचा आरोप आहे.यावर्षी आचारसंहितेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीनुसार यात भर दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेने पहिल्यांदात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेची तयारी सेवाभावी तज्ञांकडून करून देण्यासाठी येथील ज्युबिली हायस्कूल परिसरात इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रस्तावित इमारतीत तळ मजला व पहिला माळा आहे. तळमजला ७७०.८५ चौ.मी. व पहिला माळा ८१२.६५ चौ.मी. बांधकाम असून तळ मजल्यात केंद्र प्रमुखांचे कार्यालय, प्रशासकीय दालन, सभागृह, करमणूक केंद्र, गोडावून, प्राध्यापक वर्गाकरिता बसण्याची सोय, अभ्यांगताकरिता बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह तर पहिल्या माळ्यावर शिकवणी वर्ग, वाचनालय तसेच मध्ये खुला जागा व चारही बाजूने बांधकामाचा समावेश राहणार आहे. पूर्ण प्रकल्पास नकाशाप्रमाणे बांधकामास १.५० लाख खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय फर्निचर, पार्टीशन, वीज, वातानुकूलीत यंत्रणा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आहे. याशिवाय स्वयंसहाय्यता बचत समूहाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार मिळणार आहे.
विशेष म्हणजे, वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, उपाध्यक्ष संदिप गड्डमवार, सर्व सभापती, मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 50 lakhs for Competitive Examination Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.