महिला मंडळांना सभागृह बांधकामासाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST2021-09-02T05:00:00+5:302021-09-02T05:00:00+5:30

संतगुरू रविदास महाराज महिला मंडळ, भद्रावती हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मंडळाचे कार्यक्रम खासगी जागेवर ...

50 lakh fund for construction of halls for women circles | महिला मंडळांना सभागृह बांधकामासाठी ५० लाखांचा निधी

महिला मंडळांना सभागृह बांधकामासाठी ५० लाखांचा निधी

संतगुरू रविदास महाराज महिला मंडळ, भद्रावती हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मंडळाचे कार्यक्रम खासगी जागेवर पार पडत असतात. स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, याकरिता शासनाकडे २००४ पासून पाठपुरावा सुरू आहे. शिष्टमंडळाने वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेतली.

याप्रसंगी संतशिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा खंडाळे, सचिव कीर्ती पवार, कोषाध्यक्षा कविता मेंढे, सदस्य सुषमा खंडाळे तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव विनोद खंडाळे, कोषाध्यक्ष रवींद्र पवार, सदस्य प्रकाश मेंढे, मनोज नंदरे, संतोष लांडगे व सुजित गुजरकर उपस्थित होते. यावेळी दरबाण सोसायटी, भद्रावती येथील महिला मंडळाच्या जागेवर सभागृहाचे बांधकाम करून मिळण्याबाबत मंडळातर्फे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. आमदार धानोरकर यांनी संतशिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाचे दरबान सोसायटी, भद्रावती येथील जागेवर रुपये ५० लाखांचे सभागृह बांधून देण्याचे यावेळी आश्वासन दिले.

010921\img-20210831-wa0098.jpg

सभागृह बांधकामासाठी आमदारांना निवेदन

Web Title: 50 lakh fund for construction of halls for women circles