चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने ५० शेळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:50 IST2018-03-29T13:49:57+5:302018-03-29T13:50:10+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे जनावरांवर साथीचे रोग पसरले असून आतापर्यंत ५० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

50 goats deaths in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने ५० शेळ्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने ५० शेळ्यांचा मृत्यू

ठळक मुद्देसाथीचा अज्ञात रोगडॉक्टरांची धावपळ सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे जनावरांवर साथीचे रोग पसरले असून आतापर्यंत ५० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.
मागील आठवड्यापासून मेंडकी परिसरात शेळ्यांवर अज्ञात रोग पसरला आहे. एका पाठोपाठ एक अशा शेळ्या मृत्यूमुखी पडत आहे. या प्रकाराची माहिती पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांना मिळताच त्यांनी धावपळ सुरू केली. त्यांनी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उदय कोराने यांच्यासोबत संपर्क साधला. डॉ. कोराने त्यांनी आपल्या चमूसह मेंडकी गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व औषधोपचार सुरू केला. आज गुरुवारी पशुवैद्यकीय दवाखाना मेंडकी येथे उपचारासाठी विशेष शिबिर घेण्यात येत आहे.

 

Web Title: 50 goats deaths in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती