शिबिरात ५० बाटल्या रक्त जमा

By Admin | Updated: February 3, 2017 01:05 IST2017-02-03T01:05:21+5:302017-02-03T01:05:21+5:30

जैन श्रमन संघाचे आचार्य शिवमनीजी म.सा. यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त श्रमन संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

50 bottles of blood deposited in the camp | शिबिरात ५० बाटल्या रक्त जमा

शिबिरात ५० बाटल्या रक्त जमा

शिवमनीजी म.सा. अमृत जयंती : जैन श्रमन संघाचा उपक्रम
चंद्रपूर : जैन श्रमन संघाचे आचार्य शिवमनीजी म.सा. यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त श्रमन संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. चंद्रपूर येथील श्रमन संघ आणि जैन मित्र मंडळाने आयोजित शिबिरात ५० बाटल्या रक्त जमा झाले.
शिवमनीजी म.सा. यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण भारतात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये १ लाख ११ हजार १११ युनिट रक्त जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यामध्ये चंद्रपूरच्या श्रमन संघ व जैन मित्र मंडळानेही सहकार्य केले.
या शिबिराचा प्रारंभ पवित्रताजी म.सा. यांच्या शुभ मांगलिकने झाला. या शिबिरात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अंकुश आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी व. स्था. श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, महावीर इंटरनॅशनलचे नरपतचंद भंडारी, जितेंद्र चोरडिया, पंकज बोथरा, डगली, तालेरा, अमर गांधी यांच्यासह व. स्था. मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल मुथा, कोषाध्यक्ष त्रिशुल बम्ब, सचिव रोहन शाह, गौतम भंडारी, यश मुनोत, अनुप खटोड, मनीष खटोड आदीनी परिश्रम घेतले. या सर्वांनी रक्तदान केले व इतरांना प्रेरित केले. (प्रतिनिधी)

Web Title: 50 bottles of blood deposited in the camp