बल्‍लारपूर येथे ५० बेडचे डीसीएचसी रूग्‍णालय त्‍वरित उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:53+5:302021-04-23T04:30:53+5:30

सुधीर मुनगंटीवार : जिल्‍हा प्रशासनाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍याचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क बल्‍लारपूर : शहर तसेच तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागातील ...

A 50-bed DCHC hospital should be set up at Ballarpur immediately | बल्‍लारपूर येथे ५० बेडचे डीसीएचसी रूग्‍णालय त्‍वरित उभारावे

बल्‍लारपूर येथे ५० बेडचे डीसीएचसी रूग्‍णालय त्‍वरित उभारावे

सुधीर मुनगंटीवार : जिल्‍हा प्रशासनाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

बल्‍लारपूर : शहर तसेच तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागातील वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता, बल्‍लारपूर शहरात ५० बेडेड डी. सी. एच. सी. अर्थात डेझिग्‍नेटेड कोविड हेल्‍थ सेंटर उभारण्‍याची तसेच १५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आमदार मुनगंटीवार यांनी गुरुवारी बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरिश शर्मा आणि मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली व नगर परिषदेने यासंबंधीचा प्रस्‍ताव जिल्‍हा प्रशासनाला सादर करण्‍याचे निर्देश दिले.

कोरोनाची वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता, बल्‍लारपूर येथे ५० बेडची डी. सी. एच. सी. अर्थात डेझिग्‍नेटेड कोविड हेल्‍थ सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्‍यामध्‍ये ४० ऑक्‍सिजन बेड्स असावेत, याकरिता लागणाऱ्या ऑक्‍सिजनचा पुरवठा नियमित राहण्‍याकरिता डी. सी. एच. सी. रूग्‍णालयाच्‍या ठिकाणी एक ऑक्‍सिजन प्‍लांट उभारण्‍यात यावा, असे आमदार मुनगंटीवार यांनी निर्देशित केले. या डी. सी. एच. सी. रूग्‍णालयातील वैद्यकीय सेवेकरिता जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक सामान्‍य रूग्‍णालय, चंद्रपूर तथा बल्‍लारपूर पेपर मिल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या सेवा घेऊन कोरोना रूग्‍णांच्‍या सेवेत हे रूग्‍णालय तत्‍काळ कार्यान्वित करावे, असे आमदार मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. त्‍याचप्रमाणे बल्‍लारपूर शहराजवळ जे क्रीडा संकुल उभारण्‍यात आले आहे, त्‍याठिकाणी १५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्‍याचा निर्णय या चर्चेदरम्‍यान झाला. यासंबंधीचा प्रस्‍ताव त्‍वरित जिल्‍हा प्रशासनाकडे सादर करण्‍याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी नगराध्‍यक्ष व मुख्‍याधिकाऱ्यांना दिले.

Web Title: A 50-bed DCHC hospital should be set up at Ballarpur immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.