शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

म्‍युकरमायकोसिसच्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. पर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 5:11 PM

Chandrapur news चंद्रपूर जिल्‍हयातील म्‍युकरमायकॉसीस या आजाराच्‍या रूग्‍णांवर खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. इतका खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सहा रूग्‍णालयात म्‍युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय तसेच सामान्‍य रूग्‍णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाहीत. अनेक रूग्‍ण खाजगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्‍य रूग्‍णांना परवडणारा नाही. त्‍यामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील म्‍युकरमायकॉसीस या आजाराच्‍या रूग्‍णांवर खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. इतका खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना पाठविलेल्‍या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे, चंद्रपूर जिल्‍हयात कोरोना महामारीच्‍या संकटात म्‍युकरमायकॉसीस या आजाराचे संकट उद्भवले आहे. या क्षणापर्यंत म्‍युकरमायकॉसीस चे ५४ रूग्‍ण आपल्‍या जिल्‍हयात आढळले आहेत. त्‍यापैकी ३३ रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया झाल्‍या असून दुर्देवाने एकाचा मृत्‍यु झाला आहे. हा बुरशीजन्‍य आजार जिवघेणा असून अनेक रूग्‍णांना आपले डोळे, जबडा गमवावा लागतो व आयुष्‍यभर त्‍याची भरपाई होवू शकत नाही. 

यासंदर्भात सार्वजनिक आरोग्‍य मंत्री मा. श्री. राजेशजी टोपे यांच्‍याशी पाठपुरावा करून आम्‍ही सदर आजाराचा समावेश महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत करण्‍याचा निर्णय घ्‍यायला लावला. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयात सहा खाजगी रूग्‍णालये आहेत. मात्र त्‍यापैकी एकाही रूग्‍णालयात म्‍युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येवू शकत नाही. सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रूग्‍ण खाजगी रूग्‍णालयांमध्‍ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्‍येक रूग्‍णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्‍यामुळे रूग्‍णाच्‍या कुटूंबियांचे आर्थिकदृष्‍टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहे. महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत आपण सदर रूग्‍णांना उपचार देवू शकत नसल्‍याने खनिज विकास निधी अंतर्गत या रूग्‍णांचा पाच लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण उचलणे आवश्‍यक आहे, किंबहुना ती आपली जबाबदारी आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील जनता सहनशील आहे. जिल्‍हयात रोज ५०० च्‍या वर कोरोना रूग्‍ण आढळत आहे. अश्‍यातच म्‍युकरमायकॉसीस चे संकट उद्भवल्‍याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेता सदर रूग्‍णांचा ५ लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन उचलणे गरजेचे आहे, किंबहुना ही आपली जबाबदारी आहे. एक मृत्‍यु झाला आहे. हे संकट अधिक गडद होण्‍याआधी तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत सदर रूग्‍णांसाठी ५ लक्ष रू. खर्च उचलण्‍याचा निर्णय घेण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार