विद्यार्थ्यांसाठी मानव विकासच्या ४९ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:18+5:302021-02-05T07:43:18+5:30
बॉक्स ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद कोरोनामुळे बंद असलेल्या बसफेऱ्या आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र ज्या ग्रामीण ...

विद्यार्थ्यांसाठी मानव विकासच्या ४९ बसेस
बॉक्स
ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद
कोरोनामुळे बंद असलेल्या बसफेऱ्या आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र ज्या ग्रामीण भागात प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतो, अशा ठिकाणच्या बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची अडचण होत असून, त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बॉक्स
मागीलवर्षी एवढ्याच बसेस
कोरोनापूर्वी मानव विकास मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातून ४९ बसेस धावत होत्या. यंदाही १७ डिसेंबरपासून चंद्रपूर, राजुरा व चिमूर येथून प्रत्येकी १४ तर वरोरा येथून ७ बसेस शालेय वेळेवर धावत आहेत. या बसला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने बसफेऱ्या सुरू केल्याबद्दल विद्यार्थ्यांनासुद्धा दिलासा मिळाला आहे.
कोट
मानव विकास अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी १७ डिसेंबरपासून जिल्ह्यातून ४९ बसेस धावत आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीसुद्धा ४९ बसेस विद्यार्थ्यांसाठी धावत होत्या.
आर. एन. पाटील,
वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर.