चंद्रपुरात आल्या ४५ व्यापारी संघटना एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:13+5:302021-07-23T04:18:13+5:30
चंद्रपूर : चंद्रपुरातील विविध ४५ व्यापारी-उद्योजक संघटनांची शिर्षस्थ संस्था म्हणून स्थापित झालेल्या फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या कार्यकारिणीची ...

चंद्रपुरात आल्या ४५ व्यापारी संघटना एकत्र
चंद्रपूर : चंद्रपुरातील विविध ४५ व्यापारी-उद्योजक संघटनांची शिर्षस्थ संस्था म्हणून स्थापित झालेल्या फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रामकिशोर सारडा यांची निवड करण्यात आली आहे.
एमआयडीसी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, व्यापारी मंडळ, सराफा असोसिएशन अशा विविध ४५ क्षेत्रातील संघटनांची एकच संघटना म्हणून कार्य करणार आहे.
कार्यकारिणीमध्ये जिल्हा संयोजक म्हणून रामजीवन सिंह परमार, उपाध्यक्ष श्याम कुंदोजवार, सुमेध कोतपल्लीवार, दिनेश बजाज, गोपाल सारडा, महासचिव अनिल टहलियाणी, सचिवपदी पंकज शर्मा, दिनेश नथवानी, सहसचिव संजय सराफ, लक्ष्मीनारायण चांडक (मुन्ना), कोषाध्यक्ष संदिप महेश्वरी, तर जनसंपर्क अधिकारी
पदी चिराग नथवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून रमेश पटेल, फकरुद्दिन बोहरा, सुदेश रोहरा, गोपाल एकरे, असगरअली वाना,
महेश मानेक, भरत शिंदे, प्रशांत आवळे, मुकेश राठोड, मनिष चकनलवार, गिरीश उपगन्लावार, ओमप्रकाश अग्रवाल, रामचंद्र डोंगरवार, कलीम अहमद शेख,गोपाल विरानी, सुशील नारंग(हिरा), ॲड. भास्कर सरोडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सल्लागार म्हणून योगेश भंडारी (मुन्ना), महेन्द्र मंडलेचा, नरेंद्र सोनी, श्रीचंद हसानी, शिव सारडा, मिलिंद कोतपल्लीवार,
सामाजिक व सांस्कृतिक समितीमध्ये अरविंद सोनी, मनीष राजा,
सुधीर बजाज, समीर साळवे,
रवींद्रसिंग भाटिया, आरिफ खाखू,
विधी व कर समितीचे सल्लागार म्हणून सी.ए. प्रवीण गोठी, ॲड. अनुप आमटे, ॲड. अभय कुल्लरवार, मनीष सूचक, सागर चिंतावार, गिरीष नंदुरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ही कार्यकारिणी संघटनेच्या उद्देशाला सार्थ करण्याचे काम करेल असा विश्वास अध्यक्ष सारडा यांनी व्यक्त केला आहे.