दारूसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST2021-05-04T04:12:23+5:302021-05-04T04:12:23+5:30

श्रीकांत रमेश समर्थ (२२) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. हा एमएच ३१ ईक्यू ०५३४ या चारचाकी ...

45 lakh worth of liquor confiscated | दारूसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

दारूसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीकांत रमेश समर्थ (२२) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. हा एमएच ३१ ईक्यू ०५३४ या चारचाकी वाहनाने नागपूरहून देशी दारूसाठा आणत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे एनटीपीसी परिसरात नाकाबंदी केली असता ती पाहून आरोपीने वाहन घेऊन इतरत्र पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्या आरोपीला अटक केली. त्याच्या वाहनात असलेली देशी दारू (किंमत दोन लाख ५० हजार) जप्त केली व वाहन ताब्यात घेतले.

तर दुसऱ्या कारवाईत बरांज तांडा परिसरात हातभट्टीची दारू काढत असताना धाड टाकून गुळाची दारू व साहित्य असा ४२ लाखाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. यातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Web Title: 45 lakh worth of liquor confiscated