एका क्लिकवर मिळतील ४३ सरकारी सेवा
By Admin | Updated: November 4, 2015 00:54 IST2015-11-04T00:54:07+5:302015-11-04T00:54:07+5:30
राज्य शासनाने नुकताच ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू केला आहे.

एका क्लिकवर मिळतील ४३ सरकारी सेवा
सेवा हमी कायदा : वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचा व दाखल्यांचा समावेश
ज्ञानेश्वर शिरभय्ये भिसी
राज्य शासनाने नुकताच ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू केला आहे. यामुळे आता नागरिकांना जन्मदाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र अशा तब्बल ४३ सरकारी सेवा मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज लागणार नाही. या सेवा घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहेत.
यात तब्बल ४३ सरकारी सेवांचा समावेश आहे. यासाठी नागरिकांना सरकारी संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल आणि ठराविक कालावधीत नागरिकांना हवे असलेली सेवा मिळू शकणार आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावा लागेल. निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत. सद्या सेवा हमी कायद्यात केवळ ४३ सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा १३५ वर जाण्याची शक्यता आहे.