कत्तलीसाठी जाणारी ४३ जनावरे पकडली
By Admin | Updated: May 27, 2017 00:40 IST2017-05-27T00:40:19+5:302017-05-27T00:40:19+5:30
दोन ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता आंध्र प्रदेशात नेली जाणारी ४३ जनावरे तोहोगाव रस्त्यात पकडून त्यांची सुटका करण्यात आली.

कत्तलीसाठी जाणारी ४३ जनावरे पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : दोन ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता आंध्र प्रदेशात नेली जाणारी ४३ जनावरे तोहोगाव रस्त्यात पकडून त्यांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली. कोठारीचे ठाणेदार देवेंद्र ठाकुर, सहाय्यक ठाणेदार केशव पुंजडवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
मागील काही महिन्यांपासून गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात जनावरांची खरेदी करून कत्तलीसाठी आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी करीत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. ही वाहतूक कोठारी-तोहोगाव मार्गे आंध्रप्रदेशात होत असल्याची माहिती होती. कोठारी पोलिसांनी त्याकरिता पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी पहाटे एमएच ४९- ०७८६, सीजी०४-जेए ३९८५ या क्रमांकाची दोन ट्रक जनावरे वाहतूक करताना पकडण्यात आले.