४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

By Admin | Updated: September 28, 2015 01:17 IST2015-09-28T01:17:28+5:302015-09-28T01:17:28+5:30

देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत.

42 women became villagers | ४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

४२ महिला बनल्या गावाच्या कारभारी

चिमूर तालुका : संविधानाने बनविले सावित्रीच्या लेकींना पुढारी
खडसंगी : देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यामुळे अनेक महिला राजकारणात उतरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात चिमूर तालुक्यात ८० पैकी ४२ गावात सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत.
भारतीय संविधानाने महिला-पुरुषांना समान अधिकार दिले. मात्र पुरुषाच्या भेदभाव मानसिकतेने देशातील महिलांना अनेक वर्षे चुल आणि मुलापर्यंतच सीमित राहावे लागले होते. देशात अनेक वर्षे महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्या जात होते तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले. बहिष्कृत महिलांच्या हक्कासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले. महिलाच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने अनेक हाल अपेस्टा सहन करीत महिलांनाही शिक्षणाचे दारे उघडली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात पुढे सरसावल्याचे दिसत आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. सोबतच ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला अनेक गावांचा कारभार सांभाळत आहेत. चिमूर तालुक्यात नुकत्याच ८० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या कायद्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. येत्या १० आॅक्टोबरला शंकरपूर, १९ आॅक्टोबरला कन्हाळगाव व खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा महिलाच सांभाळणार आहेत. त्यामुळे ४२ गावांच्या महिलांना पाच वर्षे तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. (वार्ताहर)
भिवकुंड ग्रामपंचायतीवर दोन्ही कारभारी महिलाच
नऊ सदस्य संख्या असलेल्या भिवकुंड गट ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंच पद महिलासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच म्हणून ममता गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच म्हणून जिजाबाई झाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे गावाच्या दोन्ही कारभारनी महिला बनल्या आहेत. सरपंच, उपसरपंच महिला बनल्याने अनेक वर्षांची पुरुषांची मक्तेदानी संपुष्टात आली आहेत. तर या महिला पुरुषांच्या पुढे जाऊन कसा कारभार करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: 42 women became villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.