भरारी पथकांनी केली ४२ लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: October 7, 2014 23:32 IST2014-10-07T23:32:21+5:302014-10-07T23:32:21+5:30
निवडणूक म्हटली की पैशाचा पाऊस पडतो, असे म्हणतात. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवल्यामुळे या पावसावर आळा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने तैनात

भरारी पथकांनी केली ४२ लाखांची रोकड जप्त
चंद्रपूर : निवडणूक म्हटली की पैशाचा पाऊस पडतो, असे म्हणतात. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवल्यामुळे या पावसावर आळा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने तैनात केलेल्या भरारी पथकाने १३ दिवसात ४२ लाख ८३ हजारांची रोकड जप्त केली. दोन दिवसांप्ूर्वीच चिमुरात मोठा मद्यसाठाही या पथकाने ताब्यात घेतला. याप्रकरणात पाच जणांची पोलीस चौकशी सुरू आहे.
सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. याामुळे राष्ट्रीय महामार्गावर निवडणूक आयोगाने पथक तैनात केले होते. या पथकाने आतापर्यंत चिमूर, खांबाडा, ब्रह्मपुरी, कांतापेठ आणि सरडपार येथील वाहन तपासून ४२ लाखांची रोकड जप्त केली. या पैशाची पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत. २२ सप्टेंबर रोजी गांगलवाडी टी- पार्इंटवर सॅन्ट्रोतून तीन लाख ९० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. गडचिरोली येथील रमेश चौधरी हे एमएच ३३ ए- ३७३ या क्रमांकाच्या सॅन्ट्रोने नागपूरला जात होते. त्यांच्यासोबत मंगेश खडसे, वाहनचालक आणि आणखी जण होते. गांगलवाडी टी- पार्इंटजवळ हे वाहन पोहोचले. तेव्हा मार्गावर पथक तैनात होते. पथकाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी वाहन थांबवून तपासणी सुरू केली. गाडीत बसलेले कंत्राटदार मंगेश खडसे यांच्याजवळील प्लास्टिक पिशवीत तीन लाख ९० हजार रुपये मिळाले. मंगेश खडसे यांनी गडचिरोली नगर परिषदेचे पथदिवे आणि अन्य कामाचे कंत्राट घेतले होते. याच कामाचे साहित्य विकत घेण्यासाठी आपण जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेली रक्कम पडताळणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. २९ सप्टेंबर रोजी चंद्रपूर- नागपूर मार्गावरील खांबाडा नाक्यावर एका वाहनातून २० लाख रुपये जप्त करण्यात आले. रकमेसंबंधीची कागदपत्र सादर करु न शकल्याने रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. एमएच एसी- २४०३ या क्रमांकाचे फॉरच्युनर वाहनाच्या तपासणीत २० लाखांची रोकड आढळून आली. यावेळी गाडीतील राजेश कल्याणमल गर्ग (रा. इंदोर) यांनी ही रक्कम टोल टॅक्सच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची असल्याचे सांगितले. मात्र याबाबतची योग्य कागदपत्रे त्यांनी सादर केली नाही. २८ सप्टेंबर रोजी नागभीड तालुक्यातील कांतापेठ चेकपोस्ट नाका आणि सिंदेवाही तालुक्यातील सरडपार धाब्यावर वाहनातून सोळा लाख ६५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणच्या या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले होते.
चिमूर मतदार संघात दोन लाख २८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. तालुक्यातील कोटगाव टी पार्इंजवळ एका वाहनातून ५९० बॉटल्स दारू जप्त करण्यात आली. निवडणूक जवळ येत असल्याने प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे काम सुरू आहे, हे विशेष.(शहर प्रतिनिधी)