शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:16 IST

चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्ह्यातील या गावांना लवकरच या योजनांचा लाभ मिळणार आहे.ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये शुध्द पेयजल सर्वांना मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना सुरु केल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून ६१ गावांसाठी १७ योजना मंजूर केल्या असून त्यासाठी १०१ कोटी २६ लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच अनेक कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून शुध्द पाण्याचे एटीएम (आरो मशीन) सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील ८९ गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तथापि, २०१५ मध्ये शासनाने या योजनेला स्थगिती दिली होती. केंद्र शासनाच्या या स्थगितीला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी या प्रलंबित योजनांना मान्यता मिळाल्यामुळे प्रत्येक गावांला शुध्द पाणी देण्याच्या प्रयत्नाला गती मिळाली आहे. यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.मागील चार वर्षांच्या कालावधीत ना. लोणीकरांनी पाणी पुरवठा विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिल्याचेही नमुद केले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व जलस्वराज्य टप्पा २ असे एकत्रित मिळून चंद्रपूर जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून १८२ कोटी ८६ लाख रुपये एवढा भरघोस निधी ना. बबनराव लोणीकर यांनी उपलब्ध करून दिला आहे.८९ गावांना मिळाला फायदाज्या गावांमध्ये योजना सुरु होणार आहे, त्यामध्ये चिमूर तालुक्यातील गोरवट, अडेगाव, मिनझरी, पिटीचुवा, खातोडा, कळमगाव, बोथली व भिसी, भद्रावती तालुक्यातील- कडोली, बिजोनी, कोकेवाडा मानकर, कुनाडा व देऊळवाडा, सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव चक, पारणा, नवेगावटोला, चिटकी, सरडपार चक, तांबेगडी मेंढा व नांदगाव, कोरपना तालुक्यातील- वडगाव, हेटी, काटलाबोडी, कुक्कडसात, अंतरगांव बु. उपरवाई, नारंडा, लोणी व जेवरा या गावांचा समावेश आहे. सावली तालुक्यातील कढोली, दोनाळा, पांढरदरा, आक्कापूर, सायखेडा, डोंगरगांव मस्के, जांब बु. कारेगांव चक, विहीरगांव, उसेगाव, बोरमाळा, बेळगाव. चंद्रपूर तालुका- हिंगणाळा, अडेगाव, अंतुर्ला, महाकुर्ला, सोनेगाव, चिंचाळा लहुजी नगर, चोरगाव, बेलसणी, पांढरकवडा, साखरवाई, येरुर, माथारदेवी, खुटाळा, मोरवा. वरोरा तालुका- पिंपळगांव, सातारा, पांझुर्णी, निलजई व शेंबाळा, मूल तालुका- चकघोसरी, केळझर व गडीसुर्ला, नागभीड तालुका- कच्चेपार, मेंढा किरमीटी व पेंढरी. ब्रम्हपुरी तालुका- कन्नाळगाव, चांदगाव, मांगली, हरडोळी, भुज तुकूम, सोनड्री, अ-हेरनवरगाव. जिवती तालुक्यातील सेवादास नगर, कुनागुडा, अंबेझरी, हिमायत नगर, कुंबेझरी, चिखली खु. करनकोंडी. राजूरा तालुका- कळमना, सोंडो, विरुर रोड, चिंचोली खू. गोंडपिपरी तालुका- दरुर, धामनगांव, हिवरा. पोंभूर्णा- भिमनी व फुटाना अशा ८९ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारWaterपाणी