बल्लारपुरात ४० लाखांचा दारुसाठा नष्ट

By Admin | Updated: November 18, 2015 01:06 IST2015-11-18T01:06:18+5:302015-11-18T01:06:18+5:30

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारु पकडण्याची मोहिम आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राबविली. या दरम्यान एकूण ६५ गुन्ह्यात अवैधरित्या विकल्या ...

40 lakhs of liquor barred in Ballarpur | बल्लारपुरात ४० लाखांचा दारुसाठा नष्ट

बल्लारपुरात ४० लाखांचा दारुसाठा नष्ट


बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारु पकडण्याची मोहिम आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राबविली. या दरम्यान एकूण ६५ गुन्ह्यात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या देशी व विदेशी दारु साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. यातील तब्बल ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किंमतीचा दारुसाठा मंगळवारी बल्लारपूर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीखाली नष्ट केला.
येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर यांच्या मार्गदर्शनात मोहरील एम.एस. भोयर, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी.पी. खाडीलकर, टी.एन. आवारी, टी.जी. राठोड, यु.एस.डुंबारे, रायपुरे यांच्या मार्फत देशी दारु ११ हजार ९४४ रुपये ९० मिीमी बॉटल, १३ हजार ७७५ रुपये किंमतीच्या १०० मिलीच्या बाटल व विदेशी दारु ३० हजार ८३ रुपये किंमतीचा असा एकूण ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किमतीचा दारु नष्ट करण्याची परवानगी देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी करण्यात आली. मात्र अवैध मार्गाने दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात होता. बल्लारपूर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांवर धाडसत्र आरंभिले होते. त्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात ६५ गुन्ह्याच्या माध्यमातून ४० लाख रुपये किमती अवैध दारुसाठा पकडला. आजतागायत अवैधरित्या दारुचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारु विक्रीला लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून काही प्रमाणात यश येत आहे. लोकांचे सहकार्य मिळाल्यास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारु विक्रीला निश्चितच आळा बसणार आहे, असा विश्वास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)

३५ हजाराची दारु जप्त
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन चार चाकी वाहन व तीन आरोपीसह ३५ हजाराची देशी विदेशी दारु जप्त केली. ही कारवाई १६ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत एम.एच. ३१ सी.पी. ३२४६ या इंडिका वाहनाने विशाल लोणारे (२३), सागर गोलाईत (२५) रा. सम्राटनगर वणी हे देशी विदेशी दारुच्या पेट्या तर दुसऱ्या कारवाईत एम.एच. ०४ बी.के. ८९६० या इंडिका वाहनाने नरेंद्र शालिक बोधे रा. भद्रावती हा विदेशी दारुच्या पेट्या किंमत १५ हजार आणत असताना पोलिसांच्या तपासात आढळून आले.

Web Title: 40 lakhs of liquor barred in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.