हिंदू स्मशानभूमीसाठी ४० लाखांचा निधी

By Admin | Updated: July 26, 2016 01:08 IST2016-07-26T01:08:48+5:302016-07-26T01:08:48+5:30

येथील गावाला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी ...

40 lakhs fund for the Hindu Cemetery | हिंदू स्मशानभूमीसाठी ४० लाखांचा निधी

हिंदू स्मशानभूमीसाठी ४० लाखांचा निधी

घुग्घुस : येथील गावाला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी जिल्हा परिषद सेस फंडातून ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले. 
सदर स्मशानभूमीचा विकास कसा करावा, या दृष्टीने गावातील नागरिकांना बोलावून विकास कामाबाबत चर्चा व आलेल्या सुचना लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार उपस्थित अधिकारी जि.प.शाखा अभियंता जे. एम.फटिंग व उप विभागीय अभियंता दोरखंडे यांना निर्देश दिले. निधी अपुरा पडल्यास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभापती देवराव भोंगळे यांनी दिले.
सभागृह, पाण्याची सोय, रस्ता, नाली ,बगिचा, अग्नि दहनासाठी दोन शेड, सुरक्षा भिंत, शौचालय, बेंचेस याकरिता पक्केशेड अशा विविध सोई उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शेषराव ठाकरे, शामराव बोबडे, नारायण ठेंगणे,सुरेश बोबडे, चंद्रकांत चौधरी, प्रेमलाल पारधी, निरिक्षण तांड्रा, गणेश शेंडे, प्रमोद भातकुले, संजय भोंगळे, विनोद चौधरी, विवेक बोढे, सुनिल बाम, आगलावे गुरूजी, साजन गोहणे, बबन ढवस आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 40 lakhs fund for the Hindu Cemetery