तणनाशक औषध खाल्ल्याने ३८ बकऱ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: December 16, 2015 01:29 IST2015-12-16T01:29:49+5:302015-12-16T01:29:49+5:30
राजुरा तालुक्यातील सुबई गावातील ३८ बकऱ्यांनी तणनाशक औषध फवारलेला चारा खाल्ल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

तणनाशक औषध खाल्ल्याने ३८ बकऱ्यांचा मृत्यू
विरूर(स्टे) : राजुरा तालुक्यातील सुबई गावातील ३८ बकऱ्यांनी तणनाशक औषध फवारलेला चारा खाल्ल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सोमवारी सकाळी प्रभाकर बुटपेले यांनी त्यांच्या बकऱ्या गावाशेजारील डोंगरगाव शिवारात चारण्यासाठी नेल्या होत्या. डोंगरगाव शिवारात तणनाशक औषध फवारलेला चारा बकऱ्यांनी खाल्ला. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ३८ बकऱ्यांचे पोट फुगले व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राजुरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रमोद जल्लेवार, डॉ.नेमाडे, सहायक उपायुक्त पशुधन अधिकारी डॉ.मोरे, पशुधन अधिकारी राठोड, परिचर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुन्हा ज्या बकऱ्यांना विषबाधा झाली त्यांना अॅन्टीडोज दिले.
प्रभाकर बुटपेले यांच्या २८ बकऱ्या, प्रकाश आत्राम-१, चंदू चापले-१, शेखर लार्चलावार-१, बंडू आलेवार-१, भाऊजी चापले-१ल भिमपा मेकर्तीवार-५, बाबू पांडव-१ अशी मृत बकऱ्यांची संख्या आहे. (वार्ताहर)