शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 3.8 कोटींवर होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

गावागावात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता छाणणी त्यानंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतच खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले  प्रत्येकजण चोखपणे आपले काम सांभाळत आहे.

ठळक मुद्देनिधीसाठी प्रतीक्षा : उधारीवरच प्रशासनाला भागवावा लागणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता छाणणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी प्रशासनाला ३ कोटी ८ लाख २१ हजार रुपयांचा खर्च येणार असून ग्रामविकास  विभागाकडून हा निधी जिल्ह्याला अद्याप मिळाला नाही. तो लवकरच मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनला आहे. त्यामुळे सध्यातरी उधारीवरच काम भागविणे सुरु आहे.गावागावात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता छाणणी त्यानंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतच खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले  प्रत्येकजण चोखपणे आपले काम सांभाळत आहे.

अद्यापतरी अडचण नाहीप्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशासकीय खर्चासाठी ४९ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शासकीय निमयमानुसारच काम सुरु असून आयुक्तांकडून येणाऱ्या सुचनांचेही पालक केले जात आहे. निवडणूक खर्चासाठी कोणतीही अडचण अद्यापतरी नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर होतो प्रशासकीय खर्चग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या साहित्याकरिता निधी लागतो. याशिवाय स्टेशनरी साहित्य खरेदी करावे लागते.  पोलिंग पार्टीवरही खर्च होतो. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा लागतो. कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. वाहनांवरही खर्च होतो. याशिवाय व्हिडिओग्राफी तसेच निवडणुकीसाठी आवश्यक प्रसिद्धीपत्रकांवरही खर्च होतो. खर्च कुठे आणि कसा करायचा यावरही शासकीय नियमावली ठरलेली आहे.मागील निवडणुकीतही उशीरानेच मिळाला निधीमागील विधासभा, लोकसभा तसेच त्यापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणूक खर्च उशीरा मिळाला होता. त्यामुळे प्रशासनाने उधारीवरच कामे आटोपली. त्यानंतर आलेल्या निधीतून खर्च करावा लागला. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते तसेच निवडणूक पार पडल्यानंतर त्यांच्या हातात पडले होते. तसेच इतर खर्च प्रशासनाने उधारिवर भागवून वेळ भागविली होती. त्यामुळे यावेळी तरी वेळेत निधी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक