ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 3.8 कोटींवर होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:48+5:30

गावागावात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता छाणणी त्यानंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतच खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले  प्रत्येकजण चोखपणे आपले काम सांभाळत आहे.

3.8 crore will be spent in Gram Panchayat elections | ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 3.8 कोटींवर होणार खर्च

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 3.8 कोटींवर होणार खर्च

ठळक मुद्देनिधीसाठी प्रतीक्षा : उधारीवरच प्रशासनाला भागवावा लागणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता छाणणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी प्रशासनाला ३ कोटी ८ लाख २१ हजार रुपयांचा खर्च येणार असून ग्रामविकास  विभागाकडून हा निधी जिल्ह्याला अद्याप मिळाला नाही. तो लवकरच मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनला आहे. त्यामुळे सध्यातरी उधारीवरच काम भागविणे सुरु आहे.
गावागावात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता छाणणी त्यानंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतच खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले  प्रत्येकजण चोखपणे आपले काम सांभाळत आहे.

अद्यापतरी अडचण नाही
प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशासकीय खर्चासाठी ४९ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शासकीय निमयमानुसारच काम सुरु असून आयुक्तांकडून येणाऱ्या सुचनांचेही पालक केले जात आहे. निवडणूक खर्चासाठी कोणतीही अडचण अद्यापतरी नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर होतो प्रशासकीय खर्च
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या साहित्याकरिता निधी लागतो. याशिवाय स्टेशनरी साहित्य खरेदी करावे लागते.  पोलिंग पार्टीवरही खर्च होतो. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा लागतो. कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. वाहनांवरही खर्च होतो. याशिवाय व्हिडिओग्राफी तसेच निवडणुकीसाठी आवश्यक प्रसिद्धीपत्रकांवरही खर्च होतो. खर्च कुठे आणि कसा करायचा यावरही शासकीय नियमावली ठरलेली आहे.
मागील निवडणुकीतही उशीरानेच मिळाला निधी
मागील विधासभा, लोकसभा तसेच त्यापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणूक खर्च उशीरा मिळाला होता. त्यामुळे प्रशासनाने उधारीवरच कामे आटोपली. त्यानंतर आलेल्या निधीतून खर्च करावा लागला. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते तसेच निवडणूक पार पडल्यानंतर त्यांच्या हातात पडले होते. तसेच इतर खर्च प्रशासनाने उधारिवर भागवून वेळ भागविली होती. त्यामुळे यावेळी तरी वेळेत निधी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

 

Web Title: 3.8 crore will be spent in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.