एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:41+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली.

38% of the candidates for the MPSC exam | एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांची पाठ

एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांची पाठ

ठळक मुद्देचंद्रपुरात १३ केंद्रावर परीक्षा : ३९३८ पैकी १५०३ परीक्षार्थी गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सतत सहा वेळा समोर ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी चंद्रपूर शहरातील १३ केंद्रावर पार पडली. या परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांनी पाठ फिरवली. नागपूर विभागातून एमपीएससी परीक्षेसाठी चंद्रपूर शहरातील १३ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पहिल्या पेपरला १,५०३ तर दुसऱ्या पेपरला १,५१७ परीक्षार्थी गैरहजर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली.  
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली. शहरातील परीक्षा केंद्रावर ३ हजार ९३८ परीक्षार्थी परीक्षा देणार होते. पहिल्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५०३ परीक्षार्थी गैरहजर होते. तर दुसऱ्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५१७ परीक्षार्थी गैरहजर होते. 
शहरातील सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 
 

४०० कर्मचाऱ्यांची चमू
शहरातील १३ ही परीक्षा केंद्रावर शांतते परीक्षा पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये समन्वय अधिकारी, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई असे जिल्हाधिकारी कार्यालयातील साधारणात: ३०० कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात होते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर व आतमध्ये साधारणत: १०० पोलीस तैनात होते. त्यामुळे जिल्ह्यात एमपीएससी परीक्षा शांततेत पार पडली. 
थर्मल गनद्वारे तपासणी
एमपीएससीतर्फे एका खासगी कंपनीला कंत्राट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर, थर्मल गनद्वारे तपसाणी करण्यात आली. परीक्षार्थ्यांना मास्क सॅनिटायझर, ग्लोव्हज अशी सुरक्षा किट आयोगाकडून पुरविण्यात आली. परीक्षा हॉलवर बारकोड तपासणी झाल्यानंतरच प्रवेश देण्यात आला.

 

Web Title: 38% of the candidates for the MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.