३६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By Admin | Updated: November 1, 2015 01:04 IST2015-11-01T01:04:57+5:302015-11-01T01:04:57+5:30
महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपुरात आयोजित महारक्तदान शिबिरात ३६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

३६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
चंद्रपूर: महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपुरात आयोजित महारक्तदान शिबिरात ३६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
राज्य सरकारने गेल्या वर्षभरात अर्थात ३६५ दिवस केलेले लोककार्य, घेतलेले लोकहिताचे निर्णय लक्षात घेता या रक्तदान शिबिरात ३६५ रक्तदात्यांनी केलेले रक्तदान औचित्यपुर्ण ठरले आहे. या शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले व लोकसेवेचा संकल्प केला, त्या सर्व रक्तदात्यांचे वित्त व नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)