डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू

By Admin | Updated: May 21, 2017 00:35 IST2017-05-21T00:35:21+5:302017-05-21T00:35:21+5:30

येथून जवळ असलेल्या डोमा येथे विविध रोगाने १५ दिवसांत ३५० शेंळ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत होते.

350 goats die in various diseases at the Doma | डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू

डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू

पशुचिकित्सा शिबिर : रोशन ढोक यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : येथून जवळ असलेल्या डोमा येथे विविध रोगाने १५ दिवसांत ३५० शेंळ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत होते. ही बाब पंचायत समितीचे सदस्य रोशन ढोक यांना मिळताच त्यांनी पुढाकार घेऊन डोमा येथे पशुचिकीत्सा शिबिराचे आयोजन केले. व त्यामध्ये शेळ्यांची तपासणी करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले.
डोमा गावात बहूतेक शेतकरी शेळी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.परंतु, मागील पंधरा दिवसांपासून शेळ्यांना हगवण व विविध रोगांची लागण झाली. गावात पशुवैदयकीय दवाखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरघुती उपचार करुन खासगी डॉक्टरांची मदत घेतली. मात्र त्याचाही कोणताही फायदा झाला नाही.त्यामुळे १५ दिवसांत ३५० शेळ्या मृत्यूमूखी पडल्या.
ही बाब पिंटू मालके यांनी पं.स. सदस्य रोशन ढोक यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे रोशन ढोक यांनी पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. तसेच प्रत्येक शेतकरी व मेंढपाळ यांच्या घरी जाऊन शेळीची तपासणी केली. व उपचार केले. या शिबिरात डॉ. बैतूले, शंकरपूर येथील डॉ. मेश्राम, डॉ. तर्पेवार, डॉ. देहारी व इतर पशुधन पर्यवेक्षक आदींनी शेळ्या व पाळीव जनावरांची तपासणी केली. या शिबीरात ९५७ शेळ्या व व इतर पाडीव जनावरावरांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. केले. यावेळी प.स.सदस्य भावना बावणकर, बाजार समितीचे संचालक अमोद गौरकर संस्कृती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप गारघाटे, पिंटू मालके आदी उपस्थित होते.
लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्या काळात पशुंवर रोगांचे आक्रमण होत असते. मात्र, त्यापूर्वी डोमा येथील शेळ्यांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने हे पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्याची पाळी आली.

पशुवैद्यकीय रुग्णालयाची आवश्यकता
डोमा गावात विविध रोगांच्या लागणमुळे ३५० शेळ्याचा मृत्यू झाला. यावेळी उपचार करण्यासाठी अनेक शेतकरी धावपळ करीत होते. मात्र गावात पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे शेळ्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

Web Title: 350 goats die in various diseases at the Doma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.