कर्नाटकच्या व्यापाऱ्यालाही ३५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:15+5:302021-07-21T04:20:15+5:30
पोलीस कोठडीत ‘त्या’ आरोपीची कबुली बल्लारपूर : बल्लारपूरच्या लाकूड टिम्बर व्यावसायिकाला १५ लाखांनी गंडविल्यानंतर वाराणसी येथून अटक झालेला आरोपी ...

कर्नाटकच्या व्यापाऱ्यालाही ३५ लाखांचा गंडा
पोलीस कोठडीत ‘त्या’ आरोपीची कबुली
बल्लारपूर : बल्लारपूरच्या लाकूड टिम्बर व्यावसायिकाला १५ लाखांनी गंडविल्यानंतर वाराणसी येथून अटक झालेला आरोपी सुधाकर जितेंद्र सिंग याने कर्नाटक राज्यातील हुनसूद येथील भारत टिम्बर व्यापाऱ्याला ३५ लाखांनी गंडविल्याची कबुली दिली.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले की, आरोपीकडून लाकूड व्यवसायातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलीस कस्टडीत आरोपी सुधाकर सिंग पोपटासारखा बोलू लागला. त्याने सांगितले की, मागच्या वर्षी कर्नाटक येथील भारत टिम्बरकडून ३५ लाख रुपये घेऊन त्यांचीही फसवणूक केली. आरोपी सुधाकर हा कधी वन अधिकारी बनतो, तर कधी टिम्बर कमिशन एजंटचे काम करतो व दुसऱ्या पार्टीला विश्वासात घेऊन आपल्याकडे एवढा सागवान माल विकायचा आहे, असे सांगून प्रत्यक्ष लाकडेही दाखवितो. यामुळे व्यापारी त्याच्या फासात सापडून त्याला ॲडव्हान्स पैसे देतात; परंतु ज्यावेळी लाकडे देण्याची वेळ येते, तेव्हा हा रफूचक्कर होतो. दरम्यान, आरोपीची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी असल्यामुळे आणखी किती फसवणुकीची प्रकरणे पोलीस अधिकारी उघडकीस आणतात, याकडे टिम्बर व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
200721\img-20210719-wa0236.jpg
आरोपी