१५ कोटी ४१ लाखातील ३३ टक्के रक्कम गाव विकासासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST2021-03-25T04:27:09+5:302021-03-25T04:27:09+5:30
महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर या पाचही परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या धोरणाचा लाभ ...

१५ कोटी ४१ लाखातील ३३ टक्के रक्कम गाव विकासासाठी
महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर या पाचही परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या धोरणाचा लाभ घेत सुमारे ७८ हजार शेतकऱ्यांनी ६४ कोटींपेक्षा अधिक रक्कम भरली. धोरणानुसार जमा रकमेपैकी ३३ कोटी रक्कम गाव व जिल्हा विकास कामावर खर्च होणार आहे. धोरणाच्या व्यापक प्रसारासाठी महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यासह अभियंता, जनमित्र, सर्व तांत्रिक,अतांत्रिक अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क, ग्राहक मेळाव्याद्वारे जनजागृती सुरू असल्याने धोरणाला यश मिळत आहे. महावितरणकडून ग्राहक मेळावे, ग्रामसभा, ग्राहक संपर्क अभियान सुरू आहे.
‘त्या’ चार शेतकऱ्यांचा मोठेपणा
चंद्रपूर परिमंडळात आतापर्यंत २१ हजार ६६० शेतकऱ्यांनी वीजबिल भरणा केला. कोरपना तालुक्यात गडचांदूर उपविभाग अंतर्गत हातलोणी येथील शेतकरी साईनाथ डाखरे, जंगु सोयाम, नागो मंगाम, बाबूराव मालेकर आदींनी स्वयंस्फुर्तीने कोरपना येथील वितरण केंद्रात संपूर्ण थकीत वीज बिलाचे एक लाख ४३ हजार ७० रूपये जमा केले. अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले.