उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:01:03+5:30

मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले.

3.25 lakh 'Mask' production from Umed Group | उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

ठळक मुद्देमहिला समूहांची कामगिरी : दोन महिन्यात ५४ लाखांची आर्थिक उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमेद महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतील स्वयंसहायता समूहाने सुमारे ३.२५ लाख कापडी मास्क उत्पादन करून ५४ लाखांची आर्थिक उलाढाल केली आहे. टाळेबंदीच्या काळात केवळ मास्क विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करणारा एकमेव स्वयंसहायता समूह आहे.
मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले. मास्क तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने तज्ज्ञ मंडळीकडून कापडाचा दर्जा आणि रचना याविषयी माहिती घेऊन मास्कचे उत्पादन करण्यात आले. विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिबंधक उपाय योजना असताना क्षेत्रकार्य करीत असल्याने विविध विभागांनी उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समूहांकडे मागणी केली. आजमितीस मास्क उत्पादनातून ५४ लाखांची उलाढाल झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वयंसहायता समूहाच्या या कार्याला प्रोत्साहन दिले. दर्जाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व नियोजनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा अभियान सहसंचालक शंकर किरवे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाची भूमिका बजावली.

८०० महिलांना रोजगार
मागणीनुसार दुहेरी आणि तिहेरी कापड असलेले मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले. मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे २५० हून स्वयंसहायता समूहांनी दिवसरात्र एक करून मास्कची गरज पूर्ण केली. या माध्यमातून सुमारे ८०० हून अधिक महिलांना रोजगार मिळाला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील समूहांनी यात हिरिरीने सहभाग नोंदवून मास्क तयार केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग या शासकीय कार्यालयासोबतच स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने नोंदवलेल्या मागणीनुसार समूहांनी मास्क पुरविले. त्याचबरोबर चंद्रपूरनजीक असलेल्या खासगी विविध उद्योग कंपन्या, औषध दुकाने तसेच कापड विक्रेत्यांनीसुद्धा महिलांकडून कापडी मास्क खरेदी केली.
-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

Web Title: 3.25 lakh 'Mask' production from Umed Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.