शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

३४ पैकी ३२ पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:48 IST

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली.

ठळक मुद्देताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : ९६.७० चौ. किमी मूल वनपरिक्षेत्रातील प्रकार

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली. यात मूल वनपरिक्षेत्रातील ९६.७० चौ. किमी. क्षेत्र जंगल राखीव ठेवण्यात आले. यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी ३४ पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र गतवर्षी कमी पाऊस पडल्याने ३४ पैकी केवळ दोनच पाणवठ्यात सध्यास्थितीत पाणी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून गावाकडे धाव घेत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या २२ आॅगस्ट २०१२ च्या परिपत्रकानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना करण्यात आली. विभागीय वनाअधिकारी चंद्रपूर वनविभागाअंतर्गत पाच परिक्षेत्र निर्माण करण्यात आले. यात चंद्रपूर, चिचपल्ली, वरोरा, भद्रावती, सावली तर बफर मध्ये सहा परिक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. यात चंद्रपूर (बफर), शिवणी, पळसगाव, मूल, मोहुर्ली, खडसंगीचा समावेश करण्यात आला. मूल वनपरिक्षेत्र ९६.७० चौ. कि.मी. क्षेत्रात असून या परिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वनविभाग वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी संवेदनशिल आहे.जंगलात वन्यप्राण्यांना मुक्तपणे संचार करता यावा व पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध रहावा यासाठी नैसर्गिक व स्वनिर्मीत पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. यात मारोडा येथे पाच, भादुर्णी ११, फुलसटी- ५, जानाळा- ३, डोनी ५, कारवन ३ व करवन येथे दोन पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र सध्यास्थिती केवळ दोनच पाणवठ्यात पाणी उपलब्ध आहे. फुलसरी व डोनी या दोन क्षेत्रात सौरपंप बसविण्यात आल्याने दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी पाणवठ्यात जमा होत असते.फुलझरी व डोनी या जंगलव्याप्त क्षेत्रात विद्युत व्यवस्था नसल्याने सौरपंप पाणवठ्यासाठी वरदान ठरु पाहत आहे. मात्र इतर पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन वर्षापूर्वी पाणवठ्यात टँकरने कृत्रिम पद्धतीने पाणी पुरविल्या जात होते. यावर्षी पाणी टंचाईच्या काळात मात्र वनविभागाचे अधिकारी व प्राणी मित्र यांचे समन्वयक नसल्याने पाणवठे कोरडे पडले आहेत.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल परिक्षेत्रातील डोनी व फुलझरी येथील दोनच पाणवठ्यात सौरपंपामुळे पाणी उपलब्ध आहे. याचबरोबर सोमनाथ, भादुर्णी, मारोडा, येथील नैसर्गिक तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांची सध्यातरी पाण्यासाठी भटकंती होणार नाही.- एस.जे. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूलताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रात उन्हाळ्याच्या दिवसात आटलेल्या पाणवठ्यात टँकरने पाणी पुरविले जात होते. मात्र वनविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डोनी व फुलझरी या दोनच पाणवठ्यावर वन्यप्राण्यांना अवलंबून राहावे लागत आहे.- उमेश झिरे, प्राणी मित्र, मूल.