३२ कोटींचा अर्थसंकल्प

By Admin | Updated: March 22, 2016 01:01 IST2016-03-22T01:01:14+5:302016-03-22T01:01:14+5:30

जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०१६-१७ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थ

32 crores budget | ३२ कोटींचा अर्थसंकल्प

३२ कोटींचा अर्थसंकल्प

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०१६-१७ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थ समिती सभापतीने सादर केलेल्या बजेटमध्ये विविध विभागांसाठी ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाची तरतूद केली असून यात बांधकाम व कृषी विभागासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा बजेट ‘खरेदी बजेट’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. अर्थ समिती सभापती ईश्वर मोहुर्ले यांनी जिल्हा परिषदेचा ३२ कोटी ६४ लाख ९३ हजाराचा वार्षीक अर्थसंकल्प तर २ लाख २० हजार ५० रूपयाचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर केला.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषदेला विविध लेखाशिर्षाअंतर्गत प्राप्त होणारी रक्कम तसेच सुरूवातीच्या शिल्लकी रक्कमेसह ४४ कोटी ९० लाख ९४ हजार २०० रूपये महसुली उत्पन्न अपेक्षीत आहे. यामध्ये शासनाकडून प्राप्त होणारे उपकर, जिल्हा परिषदेने गुतंवेल्या रक्कमापासून मिळणारे उत्पन्न तसेच वनमहसुल अनुदानाचा समावेश आहे.
२०१६-१७ या वर्षाकरिता सुरूवातीच्या शिलकेसह ३२ कोटी ६७ लाख १३ हजार ५० रूपये अपेक्षीत उत्पन्न गृहीत धरून खर्चाकरिता ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाची तरतुद करण्यात आली. यामध्ये विकास हा मुख्य उद्देश ठेवून बांधकाम विभागासाठी ९ कोटी ४८ लाख ६० हजार रूपयाची तरतूद करण्यात आली. तर कृषी विभागासाठी २ कोेटी १ लाख २ हजार, पशुसंवर्धन विभागासाठी २८ लाख ४० हजार व सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ७७ लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अर्थ समिती सभापती ईश्वर मोहुर्ले व अन्य सभापती उपस्थि होते. (स्थानिक प्रतिनिधी)

सत्ताधाऱ्यांचे ‘खरेदी बजेट’
४जिल्हा परिषदेने सादर केलेला ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाचा बजेट हा खरेदी बजेट असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. सभेमध्ये विविध विषयांवर विरोधी सदस्यांनी सूचना केल्या. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले. ३० लाखांच्या वरील कामांचे तुकडे पाडून ३० लाखांच्या आत कामे करण्यासाठी ठराव घेतला. बैलबंडी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली. अहवाल सादर झाला आहे. मात्र, अहवालाचे वाचन करण्यास सभाध्यक्षांनी नकार दिला. चौकशी समितीच्या अध्यक्षांनीही अहवाल वाचायला मिळत नसल्याचे सांगीतले. त्यामुळे हा घोटाळा सत्ताधाऱ्यांकडून दाबला जात असून आजचा बजेट ‘खरेदी बजेट’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

शेतकऱ्यांना थेट अनुदान
४सभेमध्ये शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणारा फायबर क्रेटचा विषय उपस्थित झाला. या योजनेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याची योजना जिल्हा परिषदेने राबवावी, अशा सूचना विरोधी सदस्यांनी केल्या. या सूचना सुधारून थेट अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

अशी आहे विभागनिहाय तरतूद
बांधकाम विभाग
९,४८,६०,००० रूपये
४ग्रामीण रस्ते -२ कोटी
४जि.प. इमारत, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवास व जि.प. परिसर इमारतीचे विस्तारीकरण- ५० लाख.
४बांधकाम विभागाकडे मागणी होणाऱ्या विकासकामाकरिता ४ कोटी ५० लाख
४स्मशानभूमीला जोडणारे मुरूमाचे रस्ते- ५० लाख.
शिक्षण विभाग
२,८६,२८,००० रूपये
४शाळांकरिता फर्नीचर -२० लाख
४बालक्रीडा स्पर्धा -३५ लाख
४मॉडेल स्कूलअंतर्गत भौतिक व शैक्षणिक सुविधा- ३० लाख
४जि.प. शाळांतील संगणक देखभाल व दुरुस्ती- १० लाख
४शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम- ५ लाख
४प्राथमिक शाळांना संगणक खरेदी- ३० लाख
४मिशन नवचेतना प्रकल्प- ४५ लाख
४डेक्स, बेंच खरेदी- ३० लाख
आरोग्य विभाग
१,५९,५०,००० रूपये
४प्राथमिक आरोग्य केंद्राची विज देयके- २५ लाख
४रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी बसण्याची व राहण्याची सोय करण्यासाठी फर्नीचर- २५ लाख
४आरोग्य केंद्रात शुद्ध जल-५० लाख
४नेत्र तपासणी व चष्मे -३० लाख
समाजकल्याण विभाग
३,३७,००,००० रूपये
४मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी जि.प. च्या उत्पन्नातून २० टक्के निधी.
४मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाईप पुरवठा - ४० लाख
४विद्युत पंप, ताडपत्री पुरवठा- ५० लाख
४काटेरी तार व आॅईल इंजिन पुरवठा- ७० लाख
४मागासवर्गीय मुलींना संगणक प्रशिक्षण- १० लाख
४महिलांना शिलाई, पिको फॉल मशीन पुरवठा-२० लाख
४फायबर क्रेट पुरवठा- २५ लाख
महिला व बालकल्याण विभाग
१,६४,६०,००० रूपये
४महिला प्रतिनिधीसाठी मेळावे- १० लाख
४मुलींना व महिलांना संगणक प्रशिक्षण- १० लाख
४विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार व उच्च शिक्षणासाठी सहाय्य- १० लाख
४जेंडर प्रशिक्षण, कायदेविषयक प्रशिक्षण- १० लाख
४मुलींना लेडीज सायकल पुरवठा - २० लाख
४अंगणवाडीतील बालकांना गणवेश पुरवठा- १० लाख
कृषी विभाग
२,०१,७२,००० रूपये
४शेतकऱ्यांना बायोगॅस प्लॉन्ट- १० लाख
४फायबर क्रेट पुरवठा- २७ लाख
४आॅईल इंजिन, वीज पंप, पेट्रोकेरोसीन इंजिन- १५ लाख
४ताडपत्री व सेंद्रीय खत पुरवठा - ५० लाख
४पीक संरक्षण उपकरणांचा पुरवठा -२० लाख
४झिंक सल्फेट खत पुरवठा -१५ लाख
४शेतीच्या संरक्षणाकरिता तार पुरवठा- २५ लाख
सिंचन विभाग
१,७७,००,००० रूपये
४लघुपाटबंधारे तलाव देखभाल व दुरूस्ती व बांधकाम- ८५ लाख
४कोल्हापुरी बंधाऱ्यांना पाट्या -७५ लाख
पंचायत विभाग
३,३९,२०,००० रूपये
४ग्रापंचायतींना मुद्रांक शुल्क हिस्सा- २ कोटी २५ लाख
४फॉगिंग मशिन केमिकल खरेदी - १५ लाख
४मॉडेल ग्रापंचायत भवन बांधकाम - ५० लाख
४ग्रापंचायतींना घंटागाड्या - २० लाख
४स्मशानभूमी देखभाल, दुरूस्ती, सौंदर्यीकरण - २० लाख

Web Title: 32 crores budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.