शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार शिक्षणासाठी ३०० शाळांचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी  शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हे आपले ‘ॲसेट’ असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील २० याप्रमाणे ३०० शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन कोटींचा निधी देऊ, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर जि. प. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त  कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहातील  कार्यक्रमात ते बोलत होते.  मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकाश देवतळे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जि. प. स्थापनेचे हे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. जि. प. ही ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानली जाते. ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी  शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. आरोग्य सुविधा, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार असावीत. जि. प. प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी प्रास्ताविक, तर सावन चालखुरे यांनी संचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभाग प्रमुखांचे  दोनदा प्रशिक्षण घ्यावेआमदार किशोर जोरगेवार म्हणाले, २९ पैकी केवळ १४ विषय जि. प.कडे आहेत. सर्व विभाग प्रमुखांचे वर्षातून दोनदा प्रशिक्षण घ्यावे. प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जि. प. हीरक महोत्सव ही आनंदाची घटना आहे, ६० वर्षांत जिल्ह्याचा बराच विकास झाला, असे सांगितले.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण